बौध्दिक संपदा:प्रगतीचा एक मार्ग
संपत्ति अथवा मालमत्ता अनेक
प्रकारच्या असतात. सर्वसामान्यांना माहिती असलेल्या विशेषकरून स्थावर
आणि जंगम संपत्ति या आहेत. स्थावर संपत्ति मध्ये घर, शेत याचा समावेश
असतो. म्हणजे जी संपत्ति जमिनीला धरून अस्तित्वात आहे ती स्थावर संपत्ति
मग ती वडीलो पार्जित असो किंवा स्वकष्टनिर्मित असो व जंगम म्हणजे , जी
एक ठिकाणाहून दुसर्र्या ठिकाणी स्थलांतरित करता येते.उदा. पेन टेबल ई .
पण या सर्वांपेक्षा एक मोठी संपत्ति जगभरात अस्तित्वाला आलेली आहे ती
म्हणजे बौध्दिक संपदा नावाची संपत्ति खऱ्या अर्थाने बुध्दिचा वापर करून
निर्माण केलेली संपत्ति म्हणजे बौध्दिक संपत्ति असा मतितार्थ आहे. मग ती
संशोधनातून निर्माण झालेली असो, विचार मंथनातुन असो, लेखनातून असो,अथवा
कंपनीच्या नावातुन असो. संशोधनातून निर्माण झालेली बौध्दिक संपत्ति ही
पेटंटच्या रुपाने संपत्ति बनते तर बुध्दिचा वापर करून केलेल्या लेखनातून
कॉपीराईट नावाच्या बौध्दिक संपत्तीचा जन्म होतो. कंपनीच्या नावाचे
महत्त्व जपविने ज्या बौध्दिक संपदेचे मुळ आहे. ती म्हणजे ट्रेडमार्क होय
आणि या सर्वां मध्ये आगळीवेगळी पण सर्व समाजाला एकत्रित करून बौध्दिक
संपदा बहाल करणारी संपत्ति म्हणजे भौगोलिक उपदर्शन होय श्याम्पेन आणि
स्कॉच विस्कीने सदर बौध्दिक संपदेचे महत्त्व आणि अस्तित्व जगासमोर
मांडून(फ्रांस व स्वित्झर्लंड) येथील जनतेला सुफल बनवले आहे. आपल्या
दैनंदिन जीवनात दिवसातून अनेक वेळा आपण बौध्दिक संपदेच्या संपर्कात आलेलो
असतो पण आपल्याला माहिती नसते की,ही कोणाची तरी संपत्ति आहे आणि आपण
त्याच्यासाठी पैसे मोजलेले आहेत उदाहरण सांगायचे झाल्यास आपल्या सर्वाजवळ
मोबाइल फ़ोन नावाचे यन्त्र असते त्या मोबाइल मध्ये एस एम् एस (निरोप)
पाठवने व स्वीकारने याची व्यवस्था अद्यावत असतेच. आजपर्यंत मोबाइल
धारकाने किमान एकाला तरी एखादा एस एम् एस केला असेल किंवा त्याला एकतरी
एस एम् एस नक्कीच आला असला पाहीजे. पण त्या बिचार्र्या बापड्याला माहिती
नसते एस एम् एस नावाच्या तंत्रन्यानाचे पेटंट अमेरिकेतल्या टेक्सास
विद्यापीठाने कधीच घेतले आहे. थोडक्यात एस एम् एस तंत्रन्यानाची
मक्तेदारी युनिवेर्सिटी ऑफ टेक्सास यांची आहे आणि नोकिया,सम्संग मोटरोला
ई. कंपन्यांनी सदर तंत्रन्यान टेक्सास विद्यापीठाच्या परवानगी शिवाय
वापरल्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या संपत्तीच्या (पेटंटचा)अधिकाराचा
वापर करून सदर कंपन्यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये दावा ठोकला आणि तो दावा
करोडोमध्ये चालला गेला. पण आपल्याला ज्या तंत्र न्यानाचा वापर प्रति
पैसा करतोय त्याची किंमत करोडोमध्ये आहे, ती एक महत्त्वाची बौध्दिक संपदा
आहे. आणि ती कोणाची तरी संपत्ति आहे हे माहितीच नाही केवळ पेटंटचेच नव्हे
तर ट्रेडमार्क आणि कॉपीराईटची परिस्थिति काही वेगळी नाही.पारकरचा पेन
शंभर रुपयाला असतो पण आपल्याला माहिती नसते पारकर या नावासाठी
(ट्रेडमार्क) आपण पन्नासपेक्षा जास्त रुपये मोजत असतो. आपल्याला
कॉपीराईटचे महत्त्व फारसे जाणवत नाही आणि म्हणून आपले कॉपीराईट
दिवसागनिक वाया जातात.ज्या स्त्रीला दोन वेळच्या खाण्यासाठी सरकारकडे
मदत मागावी लागली होती ती स्त्री नंतर कॉपीराईट (संपत्तीच्या) अधिकरामुळे
जगविख्यात लेखिका (जे. के. रोलिंग )बनली. Harry potter या पुस्तकांच्या
मालिकामधुन जगासमोर ती एक सुसम्पन्न सबला ठरू शकली.
भारतात गल्ली बोळात अनेक कलाकार,संशोधक अस्तित्त्वात असतात पण त्यांची
बौद्धिक संपदा निर्माण होतानाच संपलेली असते कारण, त्यांना सदर संपत्तीचे
न्यानच नाही. ही संपत्ती साता समुद्रा पलीकडे जाऊ शकते आणि आपल्याला
संपन्न करू शकते आणि आपल्याला आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहजरीत्या
आणि सरळ मार्गाने संपन्न करू शकते, ही माहितीच अजून त्यांच्यापर्यंत
पोहोचलेली नाही. मग दोष सरकारचा का शिक्षणाचा या चर्चात राहायचं का
इंटरनेटच्या युगात बौद्धिक संपदेच्या माहितीजाळात घुसून प्रगतीचा मार्ग
पकडायचा हे आपण ठरवले पाहिजे. जपान मध्ये ईयत्ता सहावी पासून बौद्धिक
संपदेचे शिक्षण दिले जाते. नववी,दहावीतला विद्यार्थी पेटंटटेड वस्तू तयार
करायला लागतो आणि त्यातून राष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचा एक महत्त्वाचा
घटक बनतो. एक पेटंट जर मिळाले तर एक व्यवसाय उभा राहू शकतो हे त्यांना
बाळकडूच दिले जाते. त्यांना सहजरीत्या सांगितले जाते 'जर फळ्यावरच्या
खडूने अनावश्यक असलेली पावडर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास देत
असेल तर संशोधन करून 'डस्ट फ्रीचॉक' खडू तयार करा. त्याचे पेटंट मिळवा.
तुम्हाला पेटंट मिळाले म्हणजे तुम्ही त्या डस्ट फ्री खडूचा मोठा व्यवसाय
उभा करू शकता.त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते व कर उत्पादनातून देशाला
आर्थिक झळाळीही मिळू शकते' आणि याच प्रणालीमुळे उध्वस्त झालेल्या
जपानमध्ये राष्ट्रीय स्तरावर लाखांमध्ये पेटंट फाईल होतात. होंडा, सोनी
सारख्या कंपन्या जगाला आपल्या नावावर आणि तंत्रन्यानावर नाचवतात.
बौद्धिक संपत्तेमुळे कुठल्या एका
व्यक्तीचा किंवा कंपनीचा फायदा होतो असे मुळीच नाही.'Harry Potter ' च्या
लेखिकेला मिळालेल्या कॉपीराईट मूळे तिचा फायदा झालाच पण मोठ्या प्रमाणात
जगभरात वाचन संस्कृती निर्माण झाली. विचारांना कागदावर उतरवून स्वतःसाठी
व समाजासाठी जगण्याची एक प्रथा पुन्हा सुरु झाली. बौद्धिक संपदेची
मान्यता केवळ प्रगतशील राष्ट्रासाठीच आहे का? आपण या संपत्तीला प्रगतीचा
मूलमंत्र बनवू शकत नाही का? रवींद्रनाथ टागोरांच्या लेखनीचा सन्मान
जगभरात होऊन 'नोबेल पारीतोषीकापर्यंत मजल मारलेली आपण विसरलो का? या व
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली आहे. 'आता नाही तर कधीच नाही,
कदाचित अशी वेळ आली आहे. आपल्या बौद्धिक संपदेवर प्रगतीशील राष्ट्र
व्यवस्थित डोळा ठेऊन ती आत्मसात करण्याचे डाव रचित आहेत अथवा केले आहेत.
आपली हळद(हळदीचे पेटंट) आपल्याला परत मिळवायला दहा हजार डॉलर आपण मोजले
आहेत हे कदाचीत आपण विसरलो आहोत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा
अधिवेशनातून मिळालेल्या पुदिना पेटंटच्या माहितीकडे आपण लक्षच दिले नाही.
चीनमधील औषधी कंपनी पुदिनाच्या औषधी गुणधर्मासाठी युरोपमध्ये पेटंट अर्ज
करते काय,त्यांना पेटंट मिळते काय, आणि परत आपण ते परत मिळवण्यासाठी उभे
राहतो काय, आपल्याला हळदीचीच पुनरावृत्ती परत परत करायची आहे का? असे जर
करायचे नसेल तर बौद्धिक संपदा हा अधिकार काय आहे त्यासाठी कोणते कायदे
भारतात आहे आणि ही बौद्धिक संपदा आर्थिक व सामाजिक प्रगतीची कशी
महत्त्वाची वाट होऊ शकेल याचा विचार करणे अनिवार्य झाले आहे.
प्रा.गणेश हिंगमिरे
जी. एम. जी. सी.,
No comments:
Post a Comment